“गरज हि संशोधनाची जननी आहे” या त्रिकालबाधीत सत्याची प्रचीती ९० वर्षांपूर्वी “दि रेवदंडा को-ऑप अर्बन बँकची” स्थापना झाली त्यावेळीही आली. “ऋषीचे कूळ आणि नदीचे मुळ शोधू नये” असे म्हणतात. भावार्थ असा कि हे फार जिकिरीचे काम असते आणि हा अनुभव गेल्या ९० वर्षातील बँकेच्या कार्याचा आलेख शब्दबद्ध करताना पदोपदी आला. अर्थातच तो अतिशय रोचक असून “उद्योगिनी पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी:” या सुभाषितास साजेसा असून “सतफलाय सतकारीता” या सुवचनाचा जणू साक्षात्कारच! “दि रेवदंडा को-ऑप अर्बन बँकेची” स्थापना दिनांक १८ ऑक्टोबर १९२८ रोजी करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीला संस्थेच्या चार शाखा असून त्यातील तीन शाखा स्वमालकीच्या अद्ययावत इमारतीत कार्यांवयीत आहेत. या सर्व शाखा संगणकीकृत आहेत.

संस्थेचे उद्दिष्ट

अत्याधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्था या गोष्टींचा योग्य तो वापर करून असंख्य ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे तसेच यामध्ये मोलाची साथ मिळणाऱ्या आमच्या कर्मचारी वृंदाचा विकास करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल.

पुरस्कार कार्यक्रम

दि रेवदंडा को–ऑपरेटिव्ह अर्बन बॅंक लि . ‚ रेवदंडा ही रायगड जिल्हयातील एक अग्रणी सहकारी बॅंकेच्या रेवदंडा‚ अलिबाग‚ रोहा व पोयनाड येथे आहे . बँकेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण रायगड व रत्नागिरी जिल्हा आहे.
बँकेस दि महाराष्ट्र स्टेट को–ऑप . बँक्स् असोसिएशन लि . यांच्याकडून सन २०१०-११, सन २०१४-१५ व सन २०१५-१६ करिता कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित तसेच अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने सन २०१६ करिता बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या बॅंकेची सन २०१८- २०१९ या आर्थिक वर्षासाठी “कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बॅक“ पुरस्कारासाठी कोकण विभागातुन रु.१०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बॅकांमधुन निवड केली असल्याचे कळविले आहे. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅक्स्‌ असोसिएशनचा २४वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२० रोजी, सकाळी १०.३० वाजता , पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ( रविंद्र नाटय मंदिर ) सयानी रोड , प्रभादेवी , मुंबई येथे मा.ना. श्री. अजित पवार साहेब – उपमुख्यमंत्री , वित्त व नियोजन , महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व मा.ना. श्री, अनिल देशमुख- गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा. ना, श्री. बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री ,महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.