दि रेवदंडा अर्बन बँकेच्या पोयनाड शाखेचे स्थलांतर दि.01ऑगस्ट 2026 पासून "हरी ओम सोसायटी" पोयनाड बाजारपेठ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.
ज्या सभासद व ठेवीदारांनी के. वाय. सी. (K Y C)ची पूर्तता केलेली नाही, त्यांनी सदर पूर्तता करून बँकेला सहकार्य करावे.
आम्ही देतो ह्या सुविधा
ATM
Deposit Lockers
NEFT/RTGS
QR Code

फ्रँकिंग' (Franking)
फ्रँकिंग सेवा (Franking Service) ही कागदपत्रांवर किंवा करारांवर मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरण्याची एक अधिकृत पद्धत आहे. यामध्ये विशेष फ्रँकिंग मशीनद्वारे कागदपत्रांवर स्टॅम्प ड्युटी भरल्याचा शिक्का मारला जातो. बँकेला फ्रँकिंग परवाना प्राप्त झाला असून, ही सेवा आपल्या बँकेच्या अलिबाग शाखेत सुरु झाली आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा.
माहिती भरा
जलद आणि सोपी अर्ज प्रक्रीया
अर्ज
प्रथम आपल्याला हव्या असलेल्या रकमेसाठी अर्ज करु.
मुल्यमापन
बँक अर्ज लागु केल्यानंतर ते त्यांच्या गरजेचे मुल्यमापन करतील.
कर्ज मंजुरी
मुल्यमापन पुर्ण केल्यानंतर बँक कर्ज मंजुर करेल.
माहिती फलक
Inoperative account म्हणजे निष्क्रिय बँक खाते. जर एखाद्या बँक खात्यातून सलग दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही आर्थिक व्यवहार (पैसे काढणे, भरणे इ.) झाला नाही, तर बँक त्या खात्याला ‘इनऑपरेटिव्ह’ किंवा ‘डॉर्मेंट’ (Dormant) घोषित करते.
खाते पुन्हा सुरू करण्यासाठी,
बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज द्यावा लागतो.
केवायसी (KYC) कागदपत्रे जसे की ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो.
एक आर्थिक व्यवहार (पैसे जमा करणे किंवा काढणे) केल्यानंतर खाते पुन्हा चालू (Active)होते
DEAF खाते (DEAF Account) म्हणजे ‘डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड‘ (Depositor Education and Awareness Fund) मध्ये वर्ग केलेले दावा न केलेले (Unclaimed) बँक खाते होय.
जर एखाद्या बँक खात्यात (बचत किंवा चालू खाते) किंवा मुदत ठेवीत (Fixed Deposit) सलग १० वर्षे कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही, तर त्याला निष्क्रिय किंवा दावा न केलेले खाते मानले जाते. अशा खात्यांमधील शिल्लक रक्कम बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या असलेल्या DEAF फंडात जमा करते, खातेदाराचे पैसे हरवत नाहीत; ते या फंडात सुरक्षित असतात. खातेदार किंवा त्याचे कायदेशीर वारस बँकेच्या शाखेत योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून हे पैसे बँकेकडून पुन्हा मिळवू शकतात.
ही सुविधा आपल्या दि रेवदंडा को-ऑप अर्बन बँक लि., रेवदंडा च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.